साधकांच्या साधनेचा दीपस्तंभ असे सद्गुरु बिंदाई

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

साधकांची आध्यात्मिक आई सद्गुरु बिंदाई (टीप) ।

साधकांच्या अडचणीवर मात म्हणजे सद्गुरु बिंदाई ॥ १ ॥

साधकांच्या संघर्षावर मात करी सद्गुरु बिंदाई ।

साधकांच्या साधनेचा दीपस्तंभ असे सद्गुरु बिंदाई ॥ २ ॥

प्रत्येक जिवाची प्रीतीस्वरूप आई असे सद्गुरु बिंदाई ।

साधनेतील सूक्ष्म विचार करते सद्गुरु बिंदाई ॥ ३ ॥

गुरुदेवांचा विश्‍वास संपादन करी सद्गुरु बिंदाई ।

गुरूंचे मन जाणणारी माऊली असे सद्गुरु बिंदाई ॥ ४ ॥

शब्दही अपुरे पडती गुणगान गाण्या ।

अशी माऊली म्हणजे सद्गुरु बिंदाई ॥ ५ ॥

टीप – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड. (८.८.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF