चर्चमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचे अन्वेषण चर्चकडे देऊ नये ! – ‘हेल मेरी मूव्हमेंट’ संस्थेकडून पंतप्रधान मोदी यांना विनंतीअर्ज

याविषयी साम्यवादी आणि निधर्मीवाले कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – चर्चमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचे अन्वेषण चर्चकडे देऊ नये, अशी विनंती ‘हेल मेरी मूव्हमेंट’ या संस्थेचे संस्थापक सावियो रॉड्रिग्ज आणि जोसेफ केनेडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका विनंतीअर्जाद्वारे नुकतीच केली. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी थेट कायदा अंमलबजावणी यंत्रणेची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही ‘हेल मेरी मूव्हमेंट’ने केली.

वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करावे

सावियो रॉड्रिग्ज आणि जोसेफ केनेडी यांनी या अर्जात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी ‘हेल मेरी मुव्हमेंट’ने केरळमधील माजी बिशप फ्रॅन्को मुलक्कल आणि झारखंडमधील आल्फोंस आईंड प्रकरणी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती. बहुतेक चर्च हे कार्डिनल, बिशप, पाद्री इत्यादींची लैंगिक शोषणाची प्रकरणे झाकून ठेवू पहात आहेत. जगभर चर्चमध्ये असेच चालू आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांवर प्रकरणे मिटवण्यासाठी चर्चकडून दबाव आणला जातो. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे आणि चर्चमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी एक पारदर्शक आणि मध्यवर्ती यंत्रणा निर्माण करावी.’’


Multi Language |Offline reading | PDF