जागर आदिशक्तीचा अन् गुरुकृपेचा ॥

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस सर्वपित्री अमावास्येला आहे’, हे माझ्या लक्षात नव्हते. मी दिनदर्शिका पहात असतांना मला सद्गुरु ताईंची आठवण आली आणि गुरुदेवांनी पुढील ओळी माझ्या माध्यमातून कागदावर उतरवल्या. देवा तू मला क्षणोक्षणी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अनुसंधानात ठेवत असतोस. ‘ही कृपादृष्टी आम्हा सर्वांवर लाभावी’, हीच तवचरणी प्रार्थना !

त्रिभुवन नायकाने भार तुजवर दिला ।

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याच्या संधीकाळात ।

जागर आदिशक्तीचा या त्रिभुवनात झाला ॥ १ ॥

सर्वांची ताई तू आता देवीसमान झाली ।

आम्हा साधकांचे पालकत्व सांभाळतांना ।

जणू तू आता जगज्जननी झाली ॥ २ ॥

आमच्या आध्यात्मिक प्रगतीला गती तुझी लाभली ।

आम्हा दीनदुबळ्यांचा आधारवट तू झालीस ।

तुझ्या मार्गदर्शनाने साधनेला

दिशा ही मिळाली ॥ ३ ॥

गुरुमाऊलीचे प्रतिरूप भासते तू आम्हास ।

तुझ्या ठायी लाभते गुरुमाऊलीचे दर्शन ।

तुझ्या सहवासात मिळतो आम्हाला आनंद ॥ ४ ॥

तुझ्या माध्यमातून गुरुमाऊली करती कृपादृष्टी ।

तुझ्या निरपेक्ष प्रीतीची मिळते आम्हाला प्रचीती ॥

शब्दांनी काय वर्णावी तुझी ही अनंत महती ॥ ५ ॥

आम्ही सर्वजण करतो प्रार्थना गुरुचरणी ।

आईचा पकडलेला हात न सुटावा कधी ।

अशीच कृपादृष्टी तुझी लाभो आम्हा सर्वांवरी ॥ ६ ॥

हे माते, नागेशी येथील सर्व साधकांचा तुझ्या वाढदिनी शीरसाष्टांग नमस्कार !’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF