रामनाथी आश्रम सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जायचे ठरल्यावर व्याकुळ होऊन गुरुरायांना केलेली प्रार्थनारूपी विनवणी !

साधकांना मातापित्यासमान मायेने सांभाळणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आम्ही काही साधक सेवेसाठी नवीन वास्तूत स्थलांतरित होण्याचे निश्‍चित झाले. त्या वेळी माझ्या मनात विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या सान्निध्यात रहाण्याच्या आठवणींना आणि त्यामुळे मिळणार्‍या आनंदाला पुन्हा उजाळा मिळाला. गुरुदेवांच्या कृपेमुळे रामनाथी आश्रमाच्या अस्तित्वाच्या पहिल्या दिवसांपासूनच आम्हाला तेथे वास्तव्य करण्याची संधी मिळाली. हा आश्रम सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जातांना माझे मन कळवळले. त्या वेळी देवाने पुढील काव्य सुचवले.

श्री. अविनाश जाधव

हे गुरुराया, देशील ना रे,
आम्हा जिवांना तव दर्शनाचा आत्मानंद ? ।
सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या कुशीत ।
विष्णुस्वरूप गुरुदेवांनी आम्हाला घडवले ।
आश्रमाच्या या मायेच्या छायेत लहानाचे ।
मोठे (टीप) कधी झालो, हेही नाही कळले ॥ १ ॥

जीवनाच्या या एका तपाच्या जडणघडणीत ।
गुरुदेवांनी आश्रमात काटासुद्धा रुतू दिला नाही ।
ईश्‍वररूपी गुरुदेवांनी केलेल्या संस्कारांमुळे ।
आमची साधनेची वाट कधी भरकटली नाही ॥ २ ॥

मातेसमान सांभाळ करणार्‍या गुरुदेवांनी ।
आम्हा जिवांना कधी दृष्टीआड केले नाही ।
प्रीतीस्वरूप मायेच्या या छत्रामध्ये ।
आजपर्यंत आम्हाला काहीच उणे पडले नाही ॥ ३ ॥

हे गुरुराया, आता वेळ आली आहे दूर जाण्याची ।
दूर जाण्याच्या संवेदनांनी हृदय दाटून आले ।
मनाने नव्हे, तर शरिराने हे दूर जाणे झाले ॥ ४ ॥

हे गुरुराया, एकच इच्छा सदा मनी बाळगतो आम्ही ।
तुझ्या कृपेची अन् तुझ्या ईश्‍वरस्वरूप अस्तित्वाची ॥
कृतज्ञस्वरूप जाणीव रहावी सदा आमुच्या मनी ॥ ५ ॥

गुरुराया, आम्ही सदा नतमस्तक राहो तव चरणांवरी ।
तव कृपेचा हात सदा राहू दे अमुच्या मस्तकावरी ॥ ६ ॥

द्वापरयुगात गोपींना जशी तुझी जाणीव सदा येतसे ॥
तशीच तुझ्या अस्तित्वाची जाणीव मनी सदा राहू दे ॥ ७ ॥

दूर गेलो, तरी दुर्लभ असे तुझे दर्शन जाणिवेतून सदा होऊन ।
देशील ना रे, आम्हा जिवांना तव दर्शनाचा आत्मानंद ? ॥ ८ ॥’

टीप : वयाने

श्रीकृष्णार्पणमस्तु,
– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा. (१४.८.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF