एर्नाकुलम् (केरळ) येथील सेंट मेरी चर्चवरील अधिकारावरून झालेल्या वादानंतर १०० जणांना अटक

१२ बिशपांचा समावेश

हिंदूंच्या मंदिरांविषयी असा वाद झाल्यास मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मात्र ख्रिस्त्यांच्या चर्चविषयी तसे केले जात नाही. यालाच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात का ?

एर्नाकुलम् (केरळ) – येथील ऐतिहासिक सेंट मेरी चर्चवर अधिकार असल्यावरून दोन गटांत वाद चालू आहेत. २६ सप्टेंबरला जैकबाइट गटाने चर्चबाहेर केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी १०० जणांना अटक केली. यात १२ बिशपांचा समावेश आहे. जॅकबाईट चर्चचे मेट्रोपॉलिटन ट्रस्टी जोसेफ ग्रेगोरियस, ई.एम्. एथनेसियस आणि जी.एम्. कूरिलोस यांनाही अटक करण्यात आली आहे. ऑर्थोडॉक्स गटाकडून चर्चचे व्यवस्थापन हातात घेतल्याच्या सूत्रास जॅकबाईटकडून विरोध केला जात होता. त्या वेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

वर्ष २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऑर्थोडॉक्स समूहाला ११ सहस्र चर्चवर नियंत्रणाचा अधिकार मिळाला होता. तरीही अनेक चर्चवर या समूहाकडून नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. केरळ उच्च न्यायालयाने पोलिसांना ‘चर्चमध्ये जाऊ इच्छिणार्‍या लोकांना संरक्षण देण्यात यावे’, असा आदेश दिला. ऑर्थोडॉक्स गटाने केलेल्या याचिकेनंतर हा आदेश देण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF