विशेषांकाविषयी थोडेसे . . . !

वर्ष २०१८ मध्ये जन्मतःच संतपदावर आरूढ असलेले पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सन्मान करण्यात आला. आता याच दिव्य मालिकेत पू. वामन यांच्या रूपाने आणखी एक संतपुष्प उमलले आहे !

पू. वामन राजंदेकर

वर्ष २०१९ संपत आले आहे. आता समस्त हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, साधक आणि सज्जन यांना हिंदु राष्ट्राचे वेध लागले आहेत. अनेक उच्चकोटीचे संत, थोर विभूती, ज्योतिषाचार्य यांनी ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे ‘भावी हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी कशी असेल ?’, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रामराज्यासारखे असलेले हे आदर्श राष्ट्र चालवण्यासाठी येणारी पिढीही सक्षम असणे, ही काळाची आवश्यकताच आहे. त्यासंदर्भात हिंदु राष्ट्राचे संकल्पक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ‘आगामी हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी दैवी नियोजनानुसार विविध गुणांनी संपन्न असलेले अनेक जीव महर्लोक, जनलोक आणि तपोलोक येथून पृथ्वीवर जन्म घेतील’, असे १६ वर्षांपूर्वीच सांगितले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सनातनचे साधक घेत आहेत. आतापर्यंत उच्च स्वर्गलोक आणि महर्लोक येथून साधनेसाठी पृथ्वीवर जन्माला आलेल्या १ सहस्रहून अधिक दैवी बालकांची सनातनला ओळख झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प मूर्त रूप घेत असल्याचा प्रत्यय आता अनेक घटनांतून येत आहे. वर्ष २०१८ मध्ये जन्मतःच संतपदावर आरूढ असलेले पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सन्मान करण्यात आला. आता याच दिव्य मालिकेत पू. वामन यांच्या रूपाने आणखी एक संतपुष्प उमलले आहे.

श्रीविष्णूचे ५ वे अवतार वामन होते. श्रीविष्णूने भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशीला बटूच्या रूपात वामन अवतार घेतला. याच तिथीला १ वर्षापूर्वी पू. वामन हेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या पहिल्या वाढदिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशीला (१०.९.२०१९) त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. जन्मतः संत असलेले जीव कसे असतात. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांच्या जन्माविषयी मिळालेले ईश्‍वरी संकेत यांविषयी समाजाला माहिती मिळावी आणि या ईश्‍वरी लीलेचा सर्वांनाच आनंद घेता यावा, हे या विशेषांकाचे प्रयोजन आहे.

वाचकांना निवेदन

या अंकामध्ये प्रसिद्ध केलेला काही मजकूर हा पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर हे संत म्हणून घोषित होण्यापूर्वीचा असल्याने तेथे त्यांचा उल्लेख ‘चि. वामन’ अथवा ‘बाळ’ अशा प्रकारे करण्यात आला आहे. – संकलक


Multi Language |Offline reading | PDF