हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) धुरा सांभाळण्यासाठी ईश्‍वराने दिलेले आणखी एक वरदान ! : पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष) !

जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘चि. वामन याचा जन्म झाल्यावर ‘तो जन्मतः ७१ टक्के पातळीचा संत आहे’, असे मला जाणवले. असे असले, तरी मी ते घोषित केले नाही. याचे कारण असे होते की, साधकांना ते कळले की, ते वामनकडे निराळ्या दृष्टीने पहातील. मला तसे होऊ द्यायचे नव्हते. ‘साधकांना स्वतःला ते कळते का ?

त्यांना काही अनुभूती येतात का ?’, हे मला अभ्यासायचे होते. प्रत्यक्षातही काही साधकांना ‘वामन दैवी बालक आहे’, हे ओळखता आले. एवढेच नव्हे, तर काही संतांसह काही साधकांनाही ‘तो संत आहे’, हेही ओळखता आले. हे कळल्यामुळे मला वामनला ‘संत’ म्हणून ओळखणार्‍या साधकांचे कौतुक वाटले आणि त्यांना आलेल्या अनुभूती वाचून आनंद झाला.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनीही ‘जन्माला येणारे बाळ ‘संत’ असेल’, असे आधीच सांगितले होते. यावरून ज्योतिषशास्त्राचेही महत्त्व लक्षात येते. सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई) यांनी गर्भारपणाच्या काळात आणि पू. वामनच्या जन्मापासून आतापर्यंतच्या काळात अनेक बारकाव्यांनिशी वेळोवेळी केलेले लिखाणही अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे ‘पोटी संत जन्माला येणार असल्यास स्वतःत कोणते पालट होत जातात ? दैवी संकेत काय असतात ? देव कशा अनुभूती देतो ?’ इत्यादी गोष्टी लक्षात आल्या. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, ही म्हण प्रचलित आहे; पण हे अपूर्व दैवी बाळ गर्भाशयात येण्याआधी आणि आल्यानंतर त्याच्या दैवी लीलांचा प्रत्यय त्याच्या आईला, म्हणजे सौ. मानसी राजंदेकर यांना येत होता. सर्वसाधारण बालकांपेक्षा दैवी बालकाला जन्माला घालणे आणि त्याचे सर्व करणे, ही एक प्रकारे तपश्‍चर्याच असते. साधक असल्यामुळे पू. वामनच्या आई-वडिलांनी त्याचे सर्वकाही सहजतेने केले. पू. वामनच्या आईने लिहिलेल्या लेखात पू. वामनच्या जन्मापूर्वी आणि नंतर त्यांच्या घरी घरकाम करणार्‍या वाईट शक्तींचा त्रास असलेल्या स्त्रियांना झालेले त्रास वाचून हे लक्षात येईल की, पू. वामनमध्ये किती चैतन्य आहे !

पू. वामन यांचे आई-वडील सौ. मानसी आणि श्री. अनिरुद्ध साधना करत आहेत. यावरूनही ‘संत कोणत्या कुटुंबात जन्माला येतात?’, हेही लक्षात येते. पू. वामनमुळे ‘शुद्ध बिजापोटी । फळे रसाळ गोमटी ॥’, ही म्हण अनुभवता आली. असे अपूर्व दैवी बाळ जन्माला घातल्याबद्दल श्री. अनिरुद्ध आणि मानसी यांचे आभार मानावे तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. (चि.) वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) !

पू. वामन राजंदेकर

लवकरच प्रकाशित होणारा सनातनचा नूतन ग्रंथ !

संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सौ. मानसी राजंदेकर

पृथ्वीवरील दैवी बालके आणि बालक-संत ओळखणारे, तसेच त्यांच्याविषयी अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधन करणारे जगातील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

पू. संदीप आळशी

‘उच्चलोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांचा आध्यात्मिक स्तर जन्मतःच चांगला असतो. या बालकांमधील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुणांमुळे ‘ही बालके दैवी आहेत’, हे लक्षात येते. काही बालकांमध्ये आध्यात्मिक गुण असले, तरी त्यांना वाईट शक्तींचा त्रासही असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले दैवी बालकांची छायाचित्रे पाहून त्यांचा नेमका आध्यात्मिक स्तर ओळखतात, तसेच त्यांना आध्यात्मिक त्रास असल्यास तोही ओळखतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार दैवी बालकांच्या गुणवैशिष्ट्यांवरून ‘ते बालक कुठल्या उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहे’, ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते बालक कितव्या वर्षी संत होऊ शकते’ आदींविषयी आध्यात्मिक संशोधन कार्यही चालू आहे.’

– (पू.) संदीप आळशी (१०.९.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

ईश्‍वरी राज्य चालवण्यासाठी ‘उच्चलोकांतून अनेक दैवी बालके पृथ्वीवर जन्माला येतील’, असे १६ वर्षे आधीच सांगणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेले ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे कार्य स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर गतीने विस्तारत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या नंतर स्थुलातून हे ईश्‍वरी राज्य कोण सांभाळणार ?’, याची काळजी अन् उत्सुकता संत, तसेच साधक यांना लागली होती. परात्पर गुरु डॉक्टर वेळोवेळी याविषयी सूतोवाच करत असतांना साधकांना त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ध्यानी यायला मात्र काही वर्षे जावी लागली. पुढे दिलेल्या दोन साधकांच्या पुढील लिखाणावरून हे लक्षात येते.

१. दोन साधकांच्या लिखाणाची उदाहरणे

१ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी १६ वर्षांपूर्वी साधकांना दैवी बालकांविषयी सांगणे आणि त्याप्रमाणे घडणे’, ही एक अलौकिक घटना ! : ‘वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी २ – ३ वेळा सांगितले होते, ‘काही काळाने पुढच्या पुढच्या लोकांतील (महर्, जन, तप आदी लोकांतील) जीव पृथ्वीवर साधनेसाठी जन्माला येणार आहेत.’’ त्या वेळी हा विषय नवीनच असल्याने त्याची व्याप्ती अन् महत्त्व माझ्या लक्षात आले नव्हते. ‘वेगवेगळ्या लोकांतील जिवांनी साधनेसाठी पृथ्वीवर जन्म घेण्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना आधीच जाणीव करून देणे’, ही एक अलौकिक घटना आहे.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१९)

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १४ वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी जन आणि तप या उच्च लोकांतून बालके पृथ्वीवर जन्माला येतील’, असे सांगणे : ‘वर्ष २००५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची भेट घेण्यासाठी एक साधिका तिच्या बाळाला घेऊन आली होती. त्यांची भेट झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी उच्च लोकांतून बालके जन्माला येतील. काही बालके जन आणि तप लोकांतूनही जन्माला येतील !’’ यांपैकी एक बालक पू. भार्गवराम ‘संत’ म्हणून जन्माला आले आहेत आणि ‘दुसरे बालक चि. वामन राजंदेकर आहेत’, असे मला जाणवले. ‘हे दोघेही जनलोकातील आहेत’, असेही मला जाणवले.’ – श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०१९)

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ईश्‍वरी राज्याच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक दैवी जिवांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला असणे अन् ती साधना करत असणे

‘सध्याच्या संधीकालात साधना केल्यास काही वर्षांतच साधकांची सहस्रो वर्षांची साधना होईल’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे उच्च लोकांतील अनेक जिवांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहे आणि घेत आहेत. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या ईश्‍वरी राज्याच्या कार्यात सहभागी होण्यासाठीही अनेक दैवी जिवांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहे आणि घेत आहेत.

३. पृथ्वीवरील दैवी बालके, शिशू-संत आणि बालक-संत ओळखणारे परात्पर गुरु डॉ. आठवले जगातील एकमेव आहेत !

भगवंतावर अतूट श्रद्धा असलेली, अनेक दैवी गुणांनी नटलेली आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या सर्वोत्तम शिकवणीमुळे घडत असलेली शेकडोे दैवी बालके आज पृथ्वीतलावर साधना करत आहेत. अशी ८०० बालके उच्च स्वर्गलोक, १७७ बालके महर्लोक आणि २ बालके जन लोकांतून पृथ्वीवर जन्माला आली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी दैवी बालकांविषयी १६ वर्षांपूर्वी जे सांगितले, ते सत्य ठरले आहे. सर्वज्ञ आणि द्रष्ट्या परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्तवलेल्या घटना तंतोतंत खर्‍या ठरतात. परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्येक वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच आहे. हे सर्व पाहून मन अचंबित होते. प.पू. गुरुमाऊलीच्या या अपार कृपेमुळे आम्हा साधकांना या सर्व अद्वितीय घटना, त्यांमागील भगवंताची लीला आदी प्रत्यक्ष अनुभवायला मिळून ईश्‍वरी नियोजनाची अनुभूती थोडीफार घेता येत आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी !’

– पू. संदीप आळशी (१०.९.२०१९)

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.

पू. वामन राजंदेकर आणि त्यांची ओळख विश्‍वाला करून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !


Multi Language |Offline reading | PDF