भोपाळ येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नौका उलटून ११ जणांचा मृत्यू

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील खटलापुरा घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नौका उलटून झालेल्या अपघातात ११ जण ठार झाले. या नौकेत एकूण १८ लोक होते. नौकेत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने आणि मोठी गणेशमूर्ती असल्याने अपघात झाला. जिल्हाधिकार्‍यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. (प्रशासनाने आधीच तत्पर राहून लोकांना सुरक्षित मूर्ती विसर्जनासाठी बाध्य केले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF