कशी व्यक्त करू कृतज्ञता हे गुरुमाऊली ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

काय दिले गुरुमाऊलीने आपल्याला ।

याची मोजणी करता येईल का कोणाला ? ॥ १ ॥

दिले नामस्मरणाचे बळ ।

सोसण्या प्रारब्ध सकळ ॥ २ ॥

मार्गदर्शन केले शोधण्यास पैलू अहंचे ।

म्हणाले, चल पुढे साधका, थांबू नको मध्येे ॥ ३ ॥

कशी व्यक्त करू कृतज्ञता हे गुरुमाऊली ? ।

आले शरण तुम्हा द्यावा आसरा चरणांशी ॥ ४ ॥

भूतकाळातील आठवणी क्लेश देतात मनास ।

सोपे असते का जगणे सतत वर्तमानकाळात ? ॥ ५ ॥

नामजपाचे साहाय्य घेऊन करता येते त्यावर मात ।

न विचार भूतकाळाचा, न चिंता भविष्याची ॥ ६ ॥

वर्तमानात राहून आनंद घेऊ प्रत्येक क्षणाचा ।

न जाणो कोणता असेल अंतिम क्षण जीवनाचा ॥ ७ ॥

– सौ. अनघा दीक्षित, बेळगाव (३०.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF