बिहारमध्ये अनेक ठिकाणी मोहरमच्या दिवशी धर्मांधांकडून हिंसाचार

घरे, झोपड्या, पोलिसांची जीप आणि दुचाक्या जाळल्या !

  • हिंदूंना असहिष्णु ठरवणारे धर्मांधांच्या या असहिष्णुतेविषयी मात्र आंधळे, बहिरे आणि मुके झाल्याप्रमाणे वागतात !
  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यातील धर्मांधांच्या उद्दाम कारवाया पहाता ‘बिहार भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो !
  • असा हिंसाचार लगेच मोडून काढण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचा आदेश का दिला जात नाही ?

बेतिया (बिहार) – बेतिया येथे १० सप्टेंबरला मोहरमच्या ताजियाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या वादातून हिंसाचार झाला. या वेळी धर्मांधांच्या जमावाने १८ घरे, तसेच पोलिसांची जीप आणि ४ दुचाकी वाहने यांना आग लावली. या हिंसाचारात अनेक जण घायाळ झाले. आग लावण्यात आलेल्या घरांतील लोकांनी सांगितले की, हे एक नियोजित षड्यंत्र होते. जमावाने ट्रकमधून ज्वलनशील साहित्य आणले होते. (मोहरमच्या मिरवणुकीला अनुमती देतांना या मिरवणुकीत कोणते साहित्य आणण्यात आले आहे, हे पोलीस पहात नाहीत का ? असे पोलीस जिहादी आतंकवाद्यांना कधीतरी रोखू शकतील का ? – संपादक)

१. नरकटियागंज येथेही धर्मांधांनी हिंसाचार करतांना दगडफेक केली. झंझारपूरमध्ये धर्मांधांनी हिंसाचार केला. या वेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

घरे, झोपड्या, पोलिसांची जीप आणि दुचाक्या जाळल्या !
हिंदूंना असहिष्णु ठरवणारे धर्मांधांच्या या असहिष्णुतेविषयी मात्र आंधळे, बहिरे आणि मुके झाल्याप्रमाणे वागतात !


Multi Language |Offline reading | PDF