महोबा (उत्तरप्रदेश) येथे अवैध मजार तोडण्यास बहुसंख्य हिंदूंचा विरोध !

  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि तथाकथित सर्वधर्मसमभावाच्या परिणामामुळे अशी कृती त्यांच्याकडून होत आहे !
  • देशातील एकातरी हिंदु मंदिरावर करण्यात येणार्‍या कारवाईचा विरोध अन्य धर्मिय कधी करतात का ?

महोबा (उत्तरप्रदेश) – येथील सालट गावामध्ये स्थानिक भाजप आमदाराच्या तक्रारीवरून वनविभागाच्या भूमीवर असलेली दीडशे वर्षे जुनी मजार (इस्लामी धार्मिक व्यक्तींची कबर) तोडण्यासाठी गेलेल्या वनाधिकार्‍यांना हिंदूंनीच विरोध केल्याची घटना १० सप्टेंबरला घडली.

जिल्हा वन अधिकारी रामजी राय यांनी सांगितले की, पीर बाबा मजार तोडण्यासाठी गेलो असता हिंदूंनीच त्याला विरोध केला. येथे केवळ ५-६ मुसलमान कुटुंबे आहेत. त्यांच्यापेक्षा हिंदूंची या मजारवर अधिक श्रद्धा असल्याने त्यांनी ती तोडण्यास विरोध केला. अशामुळे ती मजार तोडणे अवघड झाले आहे. २-३ वर्षांपूर्वी येथील गावकर्‍यांनी वर्गणी काढून या मजारच्या भोवती अवैधरित्या भिंती आणि वर घुमट बांधले आहे. त्याला तोडण्यास हिंदूंनी विरोध केला. (भिंती आणि घुमट बांधेपर्यंत वनविभागाचे अधिकारी झोपले होते का ? आताही आमदारांनी तक्रार केली नसती, तर वनाधिकारी ते पाडण्यासाठीही गेले नसते !- संपादक)


Multi Language |Offline reading | PDF