पाऊस गणेशोत्सवातला !

श्री. सुमित सागवेकर

उत्साहात चालू होता
गणेशोत्सव मुंबई-पुण्याचा ।

गणपति आले आणि दीड
दिवसांनी गेले ॥ १ ॥

शास्त्राप्रमाणे निर्विघ्न पार
पडले घरगुती गणपति ।

सर्व सुरळीत होते आणि
ढग कडाडले ॥ २ ॥

श्रावणातील सर समजून
सर्वांनीच दुर्लक्ष केले ।

आडोशाला सर्व थांबले;
पण पाऊस काही थांबेना ॥ ३ ॥

रस्ते भरले, गल्लोगल्ली पाणी साचले ।
धरण भरले, वाहू लागले ।

वाहतुकीचे मार्ग ठप्प होत आले, गणेशोत्सवाचे मंडप भिजले ।
काहींच्या मंडपात पाणी शिरले ॥ ४ ॥

ही केवळ घटना होती; पण काय असेल
गणपतिबाप्पाचा कार्यकारणभाव ?।

तो विघ्नहर्ता आहे ना ?
मग पाऊस का नाही थांबवला ?॥ ५ ॥

पण नीट विचार केल्यावर वाटले,
त्यानेच बोलावले का पर्जन्यदेवतेला ? ।

थांबविण्या सर्व अपप्रकार उत्सवातला ।
बाप्पाने पाऊस स्वतःच आणला का ? ।
काहींनी खर्चाला आळा घातला खरा; कारण पूर आला होता ॥ ६ ॥

पण…

देश आणि धर्म संकटात असतांना,
आम्ही उत्सवात मौजमजाच
करण्यात गुंग ।

कर्णकर्कश आवाजातील
ढोल थांबवायला
आला का पाऊस ? ॥ ७ ॥

कि काळजाचे ठोके वाढवणारा
डीजे थांबवायला आला पाऊस ? ।

विद्युत् रोषणाईमध्ये व्यर्थ जाणारा पैसा
आणि वीज वाचवण्यासाठी आला का पाऊस ? ॥ ८ ॥

उंच मूर्ती पावसात कशा झाकणार ।
यातून लागणारे पाप
सर्वांच्या माथी पडणार ।

अधर्माचरण थांबवायला
आला का पाऊस ? ॥ ९ ॥

धर्माचरणाचा उत्सव आनंदच देतो ।
अधर्माचरणाचा उत्सव
आनंद हिरावून घेतो ॥ १० ॥

उत्सव आमच्या मजेसाठी कि गणपतिबाप्पाच्या पूजेसाठी ? ।
उत्सव आमच्या हिंदूंच्या
एकोप्यासाठी कि स्पर्धेसाठी ? ।

उत्सव गणपति बाप्पाची कृपा संपादन करण्यासाठी
कि त्याच्या अवकृपेसाठी ?॥ ११ ॥

हे गणपति बाप्पा, या पावसात खर्‍या
भक्तांना तुझ्या भक्तीत भिजवून टाक ।
तुझ्या भक्तांना तुझ्या कृपेने न्हाऊ घाल ।

आम्हा सर्व लेकरांना
गुर्वाज्ञापालनेचे वरदान दे ।
आमची साधना निर्विघ्न होऊ दे ।
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य तुला अपेक्षित असे घडू दे ॥ १२ ॥

बाप्पा तू आलास, दहा दिवस राहिलास ।
चैतन्य देऊन जा, आनंद देऊन जा ।
तुझ्या सेवेत न्यून पडलेल्या भक्तांना क्षमा करून जा ॥ १३ ॥

गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

गणपति बाप्पाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF