हे सिद्धीविनायका, सनातना सतत तव वरदान लाभावे ।

हे गजानना, शिवपुत्र देवा ।
कशी करू रे तुझी सेवा ॥

न कळे मम बुद्धीसी आता ।
सिद्धीविनायका आमुचा भक्तीभाव पहावा ॥ १ ॥

वंदितो गणेशा सहस्रनामे बहु आनंदे ।
संजीवास तुझे वरदान असो स्वानंदे ॥

तुवा अर्पिलेला दिला तया प्रसादे ।
महत्तम व्यक्तीमत्त्वा मुक्ती मिळता आशा नांदे ॥ २ ॥

सनातना सतत तव वरदान लाभावे ।
छंद जडो तुझा सर्वां ऐसा मनोभावे ॥

सिद्धीविनायका तव लहरींनी वहावे ।
संजीव हस्ते विधी महत्कार्य सफल व्हावे ॥ ३ ॥

गुरुदेवांचे आशीर्वचन मिळती साधनी मानवा ।
नमितो विष्णुरूप सत्पुरुषास शक्ती-भक्ती भावा ॥ ४ ॥

– श्री. शरदचंद्र तावडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF