‘श्री गणेशाच्या मूर्तीतून पांढर्‍या रंगाचे किरण येत आहेत आणि थकवा नाहीसा होत आहे’, असे जाणवणे

श्री गणेशासंदर्भात साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. सुषमा पेडणेकर

‘२९.८.२००५ या दिवशी मला पुष्कळ थकवा जाणवत होता. मी दुपारपर्यंत झोपून होते. सायंकाळी ५.३० वाजता मी ध्यानमंदिरातील श्री गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊन बसले. मी गणपतीला प्रार्थना केली, ‘हे गणेशा, मला माझ्या गुरुदेवांची पुष्कळ सेवा करून ईश्‍वरापर्यंत पोचायचे आहे. मला सेवा करण्यासाठी शक्ती दे.’ त्यानंतर मी श्री गणपतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत होते. त्या वेळी मला ‘श्री गणेशाच्या मूर्तीतून पांढर्‍या रंगाचे किरण माझ्याकडे येत आहेत. माझा थकवा हळूहळूू नाहीसा होत आहे’, असे जाणवले.’

– कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २००५)


Multi Language |Offline reading | PDF