गणेशमूर्तीच्या खालच्या बाजूला लिहिलेल्या ‘सनातन संस्था’ या अक्षरांतून तेज निर्माण झाल्याचे दिसून तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे

श्री गणेशासंदर्भात साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. राजश्री सखदेव

‘२०.९.२००५ या सायंकाळी ५.४५ वाजता मिरज आश्रमातील श्री गणपतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालून झाल्यावर मी खाली वाकून श्री गणपतीला नमस्कार केला. नमस्कार करून उठतांना मूर्तीच्या खालच्या बाजूला कोरलेली ‘सनातन संस्था’ ही अक्षरे पिवळी धमक असल्याचे मला जाणवले. त्या अक्षरांतून तेज निर्माण होऊन ते सर्वत्र पसरतांना दिसले. त्यानंतर त्या अक्षरांच्या ठिकाणी मला परात्पर गुरु डॉक्टर दिसले. काही वेळातच परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप विशाल होतांना दिसले. ते रूप मी पाहू शकत नव्हते. त्यांच्या रूपाचा काही भागच मला दिसत होता. ‘नेमका कोणता भाग दिसत होता’, तेही मला कळले नाही; पण त्या भागाकडे पाहून माझे डोळे दिपत होते. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी मला निळ्या रंगाचे सुदर्शनचक्र फिरतांना दिसले. नंतर बराच वेळ मला सुदर्शनचक्र दिसत होते.’

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सप्टेंबर २००५)


Multi Language |Offline reading | PDF