सुरक्षेच्या कारणास्तव पाकच्या दौर्‍यावर जाण्यास श्रीलंकेच्या १० क्रिकेट खेळाडूंचा नकार

‘काश्मीरमध्ये हिंसाचार होत आहे’, ‘नरसंहार केला जात आहे’, असा भारतावर आरोप करणार्‍या पाकची अंतर्गत स्थिती श्रीलंकेच्या खेळाडूंनी उघड केली ! यावर पाक कांगावाच करणार !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील १० खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये हा दौरा होणार आहे. ‘खेळाडूंच्या कुटुंबियांनी खेळाडूंच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे’, अशी माहिती श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो यांनी दिली. वर्ष २००९ मध्ये लाहोर शहरात श्रीलंका क्रिकेट संघावर आतंकवाद्यांनी प्राणघातक आक्रमण केले होते. त्यातून श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन बंद झाले होते. वर्ष २०१५ आणि वर्ष २०१८ मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचे संघ पाकमध्ये एकदिवसीय मालिका खेळले; मात्र अन्य कोणत्याही मोठ्या देशाच्या संघाने पाकमध्ये सामने खेळण्यास नकार दिला आहे.

(म्हणे) ‘भारताच्या धमकीमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचा नकार !’- पाकचे मंत्री फवाद हुसैन चौधरी यांचा भारतद्वेष

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी या प्रकरणी ट्वीट करून आरोप केला की, मला एका क्रीडा समालोचकाने सांगितले की, भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकी दिली आहे की, जर ते पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाण्यास नकार देणार नसतील, तर त्यांना भारतात खेळवण्यात येणार्‍या आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेमधून बाहेर काढण्यात येईल. खेळामध्ये अंधराष्ट्रवादाला जोडण्याचा निषेध झाला पाहिजे. (पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे पाक क्रिकेटसंघात असतांना त्यांना भारतीय क्रिकेट संघाशी खेळणे, हा जिहादचाच भाग आहे’, असे वक्तव्य केले होते. अंधराष्ट्रवादाची भाषा करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF