‘सद्गुरु (सौ.) बिंंदा सिंगबाळ यांच्या खोलीतील चांदीच्या गणपतीच्या चरणांवर वाहिलेले फूल ठेवलेल्या डबीतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि फुलाभोवती चैतन्याचे वलय आहे’, असे जाणवणे

श्री गणेशासंदर्भात साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. वेदिका दहातोंडे

‘२७.७.२०१९ या दिवशी बाबांनी मला छोट्या डबीत ठेवलेले फूल दाखवले आणि ‘त्या फुलाकडे बघून काय जाणवते ?’, याचे निरीक्षण करायला सांगितले. त्या वेळी ‘डबीतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे. फुलाभोवती १५ सें.मी. आकाराचे चैतन्याचे वलय आहे’, असे मला जाणवले. मी बाबांना त्या फुलाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काल हे फूल सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीतील चांदीच्या गणपतीच्या चरणांवर वाहिले होते.’’

– कु. वेदिका अशोक दहातोंडे (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF