गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम:॥

पू. अनंत आठवले

कर्मांंचे पाप-पुण्य कसे लागू द्यायचे नाही, हे शिकवणारा

अध्याय ३ – कर्मयोग

१.  तत्त्वज्ञान

१ उ. कर्मफळ

१ ऊ २. पापाचरणाचे कारण : मनुष्याची इच्छा नसली, तरी त्याला कोण पाप करायला लावते ? श्रीकृष्ण सांगतात की, रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम अन् क्रोध हेच ते वैरी आहेत. यांची भूक कधीही भागत नाही. ते इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यांत राहून मनुष्याच्या विवेकाला झाकतात. (अध्याय ३ श्‍लोक ३६, ३७, ३९, ४०)

१ ए. ‘काम’ हा शत्रू असणे : इंद्रियांना ‘श्रेष्ठ’ म्हणतात. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे आणि मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. ‘बुद्धीच्याही पलीकडे आहे, तो आपला आत्मा आहे’, हे जाणावे आणि कामरूपी (परिशिष्ट क्र. १, सूत्र ५) दुर्धर शत्रूचा नाश करावा. (अध्याय ३ श्‍लोक ४२,४३)

विवेचन : कामना हा शत्रू इंद्रिये आणि मन ह्यांना ग्रासतो. मग माणसाकडून चांगली-वाईट सकाम कर्मे होतात आणि त्यांची फळे भोगावी लागतात. पण इंद्रिये आणि मन ह्यांच्यापेक्षा बुद्धी आणि त्यापेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे, म्हणून आत्म्याच्या बळावर मनावर नियंत्रण ठेऊन कामरूपी शत्रूला पराजित करावे.   (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’


Multi Language |Offline reading | PDF