(म्हणे) ‘भारत-पाक यांच्यातील तणाव निवळल्याने मध्यस्थीला सिद्ध !’ – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेला अफगाणिस्तानची चिंता सतावत आहे. अमेरिकेचे सैन्य तेथून परत गेल्यावर पाक किंवा भारत यांच्या माध्यमातून तेथील स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ट्रम्प अशी विधाने सातत्याने करत आहेत !

वॉशिंग्टन – काश्मीरच्या सूत्रावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, हे सर्वांना ठाऊक आहे; परंतु २ आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जेवढा तणाव होता, तो आता न्यून झाला आहे. दोन्ही शेजारी देशांना आवश्यक वाटल्यास मी मध्यस्थीसाठी सिद्ध आहे, असा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ट्रम्प यांनीही यापूर्वी असे विधान केले होते, तेव्हा भारताने अप्रसन्नता व्यक्त केल्यावर अमेरिकेच्या प्रशासनाने सारवासारव करत ‘काश्मीरचा प्रश्‍न दोन देशांमधील अंतर्गत प्रश्‍न आहे’, असे स्पष्ट केले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांची भेट घेतल्यावर ‘काश्मीरच्या सूत्रावर तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही’, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही ट्रम्प यांनी पुन्हा असे विधान केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF