पाठीत चमक भरल्यावर होणार्‍या वेदना चांदीच्या गणपतीच्या चरणांवर वाहिलेल्या फुलातील चैतन्याने काही घंट्यांतच न्यून होणे

श्री गणेशासंदर्भात साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

चांदीची श्री गणेशमूर्ती
श्री. अशोक दहातोंडे

‘२७.७.२०१९ या दिवशी अंघोळ करतांना माझ्या पाठीत चमक भरली. श्‍वास घेतांनाही मला छातीत पुष्कळ वेदना होत होत्या. मी कशीतरी अंघोळ केली. मला बसतांना आणि चालतांना त्रास होत होता. मी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत होतोे.

मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात गेलो. तेव्हा डॉ. अजय जोशी स्वागतकक्षात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राची पूजा करत होते. ते काही वेळा ‘पूजेच्या निर्माल्यातील फुलांतील चैतन्य मला मिळावे’, यासाठी ती फुले मला देतात. पाठीत चमक भरल्याने मला तीव्र त्रास होत होता; म्हणून मी काकांना सांगितले, ‘‘मला चैतन्य (निर्माल्यातील फूल) द्या.’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘सद्गुरु (सौ.) बिंंदा सिंगबाळ यांच्या खोलीतील चांदीच्या गणपतीच्या चरणांवर वाहिलेले फूल कोणाला द्यावे ?’, असा मी विचार करत होतो. (‘महर्षींच्या आज्ञेने ही मूर्ती गुरुदेवांनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सद्गुरु बिंदाताईंना दिली आहे.’ – संकलक) तेवढ्यात तुम्ही आलात. मी नेहमी गणेशमूर्तीवर घातलेल्या ‘प्लास्टिक’च्या आच्छादनाबाहेर फूल वाहतो. काल यज्ञ झाल्याने गणपतीच्या मूर्तीवरील ‘प्लास्टिक’चे आच्छादन काढून ठेवले होते. काल मी गणपतीच्या चरणांवर फूल वाहिले होते. ते फूल तुम्हाला देतो.’’ त्यांनी ते लाल रंगाचे फूल मला दिले. माझ्या पाठीत चमक भरल्याने २ – ३ दिवस होऊ शकणारा त्रास मला फूल मिळाल्यावर काही घंट्यांतच अल्प झाला. परात्पर गुरुमाऊली करत असलेल्या कृपेसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF