आम्हाला भारतात राजकीय आश्रय द्या !

पाकमधून कुटुंबासह भारतात आलेले पाकच्या सत्ताधारी पक्षाचे माजी शीख धर्मीय आमदार बलदेव सिंह यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

  • पाकमधील अल्पसंख्याकांची ही स्थिती मानवाधिकार संघटना, भारतातील पाकप्रेमी, तसेच खलिस्तानवादी यांना दिसत नाही का ?
  • पाकच्या सत्ताधारी पक्षातील माजी शीख आमदारही पाकमध्ये सुरक्षित नसेल, तर तेथील अन्य हिंदू आणि शीख यांची स्थिती काय असेल, याचा विचारही न केलेला बरा !
आपल्या परिवारासोबत बलदेवकुमार सिंह

चंडीगड (पंजाब) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे ४३ वर्षीय माजी आमदार बलदेवकुमार सिंह पाकिस्तान सोडून भारतात आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘राजकीय आश्रय द्यावा’, अशी विनंती केली आहे. बलदेवकुमार सिंह सध्या ३ मासांच्या ‘व्हिसावर’ भारतात आले आहेत. भारतात येण्यापूर्वीच त्यांनी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांना लुधियानातील त्यांच्या नातेवाइकांकडे पाठवले होते. ‘बलदेवकुमार सिंह यांना राजकीय आश्रय देण्यावर भारत विचार करत आहे’, असे सूत्रांनी सांगितले.

बलदेवकुमार सिंह यांनी ‘ए.एन्.आय. वृत्तसंस्थेला सांगितले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. केवळ अल्पसंख्याकच नव्हे, तर मुसलमानही पाकमध्ये सुरक्षित नाहीत. अनेक अडचणींना तोंड देत आम्ही पाकमध्ये जगत आहोत. मी पाकमध्ये परत जाणार नाही. भारत सरकारने पाकमधील हिंदु आणि शीख कुटुंबियांसाठी एखादे ‘पॅकेज’ घोषित करावे. त्यामुळे ते पाकमधून भारतात परततील. मोदी यांनी तेथील हिंदू आणि शीख यांच्यासाठी काहीतरी करावे. त्यांच्यावर तेथे प्रचंड अत्याचार होत आहेत. इम्रान खान यांनी दिलेले एकही वचन पूर्ण केले नाही.

मुसलमान होण्यास सांगतात ! – बलदेव कुमार यांची लहान मुलगी रिया

बलदेव कुमार यांची लहान मुलगी रिया म्हणाली की, तेथे आम्हाला सगळेच म्हणायचे, ‘तुम्ही मुसलमान व्हा.’ आता आम्हाला येथेच (भारतात) रहायचे आहे. येथे चांगले वाटते.

बलदेवकुमार यांची पत्नी भावना यांनी म्हटले की, ‘मी परत पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. आम्हाला आता येथेच रहायचे आहे.’


Multi Language |Offline reading | PDF