ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास उद्युक्त केल्याच्या प्रकरणी तिघांना अटक आणि सुटका

केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करावा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु धर्माच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरणे आणि ग्रामस्थांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी उद्युक्त करणे या आरोपांखाली पोलिसांनी तिघांना अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. हिंदू जागरण मंचने केलेल्या तक्रारीनंतर आरोपींच्या विरोधात पोलिसांनी प्रथमदर्शी अहवाल दर्ज केला आहे.

१. ख्रिस्ती मिशनरी असलेले बलराम गौतम, मदन लाल आणि बनवारी लाल हे ग्रामस्थांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास उद्युक्त करत होते. त्यांनी हिंदूंच्या देवतांच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केली आणि लोकांना मूर्तीपूजा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे हिंदू जागरण मंचचे सदस्य शेखर मिश्रा, किशन मिश्रा आणि अमन मिश्रा यांनी पोलिसांना सांगितले.

२. ‘ख्रिस्ती मिशनरी गौतम लोकांना हिंदु धर्म सोडण्यासाठी लाच देत होते. जिल्ह्यात धर्मांतर करणारी एक टोळी कार्यरत आहे. हे मिशनरी त्यांच्या सभांमधून हिंदु धर्माचा अवमान करणारी भाषणे करतात’, असे हिंदू जागरण मंचचे जिल्हा सचिव संजय अवस्थी यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF