गोमूत्रापासून बनवण्यात येणार्‍या औषधांपासून कर्करोगावर उपचार होत आहेत ! – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनी चौबे

कोईम्बतूर (तमिळनाडू) – विविध प्रकारच्या औषधांमध्ये गोमूत्राचा उपयोग केला जातो. कर्करोगासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही गोमूत्राचा उपयोग केला जातो. त्यातही देशी गायींच्या गोमूत्राचा अधिक वापर होतो. यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालय कर्करोगावर उपचार करण्यासाठी गोमूत्रापासून औषध बनवण्यावर गांभीर्याने प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनी चौबे यांनी येथे दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

चौबे पुढे म्हणाले की, मधुमेह आणि कर्करोग हे आजार बरे करणे, हे आज पूर्ण जगात एक आव्हान बनले आहे. आम्ही हे आजार मुळापासून नष्ट करू, असा दावा करणार नाही; मात्र यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी वर्ष २०३० पर्यंत यावर उपाय काढण्याची मर्यादा आम्ही ठरवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF