गीताज्ञानदर्शन

॥ श्रीकृष्णाय नम:॥

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

कर्मे करूनही त्यांचे पाप-पुण्य कसे लागू द्यायचे नाही, हे शिकवणारा

अध्याय ३ – कर्मयोग

१. तत्त्वज्ञान

१ उ. कर्मफळ

१ उ ३. कर्मफळाची आसक्ती घालवण्याचा उपाय

विवेचन

गुणविभाग आणि कर्मविभाग हे अनित्य असून आत्मा त्यांच्यापासून वेगळा अन् निर्लिप्त आहे. ‘गुणच गुणांमध्ये कार्यरत असून आत्मा त्या कर्मांचा कर्ता नाही’, हे जाणणे, म्हणजे गुणकर्मविभागाचे तत्त्व जाणणे आहे.

१ ऊ. मनुष्याच्या कल्याणकारी मार्गातील विघ्ने

१ ऊ १. इंद्रियांच्या अधीन होण्याने होणारी हानी : इंद्रियांंचा त्यांच्या भोगांमध्ये अनुराग आणि द्वेष असतो. त्यांच्या अधीन होऊ नये; कारण ती (अनुराग आणि द्वेष) कल्याणकारी मार्गातील विघ्ने आहेत. (अध्याय ३, श्‍लोक ३४) (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’


Multi Language |Offline reading | PDF