राज्यातील बहुतांश शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद

मुंबई/गडचिरोली – राज्यभरातील जिल्हा परिषद, तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी संप पुकारल्यामुळे राज्यभरातील बहुतांश शाळा ९ सप्टेंबरला बंद होत्या. आझाद मैदान येथे शिक्षकांनी आंदोलन केले. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्याआधीची निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी संप पुकारला आहे. केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील सर्व भत्ते लागू करावेत, कंत्राटी धोरण रहित करून या कर्मचार्‍यांना कायम करावे, यांसारख्या दहा मागण्या मागण्यात आल्या आहेत. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला होता; मात्र मुंबईतील काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ५ सहस्र शिक्षक आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF