गड-किल्ल्यांना हात लावल्यास इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी सहन करणार नाहीत ! – राज ठाकरे

मुंबई – राज्यातील गड-किल्ल्यांना हात लावल्यास महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘सरकारला उत्पन्न हवे असल्यास त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत’, असेही ते म्हणाले.

राज्यातील काही गड-किल्ले ६० ते ९० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी,यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF