१५ ऑगस्ट आणि रक्षाबंधन यांसंबंधी धर्मशिक्षण देणार्‍या दृकश्राव्य माहितीपटांच्या (व्हिडिओज) माध्यमांतून लक्षावधी लोकांपर्यंत पोचला विषय !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने १५ ऑगस्ट अन् रक्षाबंधन यांचे महत्त्व सांगणारे आणि रक्षाबंधन हा सण धार्मिकदृष्ट्या योग्य प्रकारे कसा साजरा करू शकतो, यांविषयी माहिती देणारे दृकश्राव्य माहितीपट (व्हिडिओज) सिद्ध करण्यात आले आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषांत असलेले हे व्हिडिओज गोवा, तसेच महाराष्ट्र या राज्यांतील विविध जिल्ह्यांत स्थानिक केबलवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आले. या धर्मसत्संगांचे केबलद्वारेे प्रसारण करण्यास सहाय्यक ठरलेल्या केबल वाहिन्यांची नावे आणि त्यांची दर्शकसंख्या, यांचा आढावा पुढील सारणीत दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF