ज्यांचे पूर्वज राक्षस होते, तेच भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत ! – वसीम रिझवी, अध्यक्ष, सेंट्रल वक्फ बोर्ड

जे एका मुसलमानाला कळते, ते जन्महिंदू असलेले आणि श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे पुरोगामी, निधर्मीवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना का कळत नाही ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीराम यांच्या अस्तित्वावर जे प्रश्‍न निर्माण करत आहेत त्यांचे पूर्वज कधीकाळी राक्षस होते. ज्या राक्षसांचा श्रीरामाने वध केला त्यांचेच वंशज आज श्रीरामाला नाकारत आहेत, अशी कठोर टीका उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या रामजन्मभूमीवरील नियमित सुनावणीच्या वेळी सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता राजीव धवन यांनी युक्तीवाद करतांना ‘रामायण हे काव्य होते’, असे म्हटले होते. त्यावर रिझवी यांनी वरील टीका केली.

१. रिझवी म्हणाले की, बाबरी मशिदीच्या पक्षकारांना पाकच्या आतंकवादी संघटनांकडून पैसे मिळतात. या पैशांतून ते त्यांचे अधिवक्ता राजीव धवन यांना पैसे देत आहेत. त्यामुळे अधिवक्ता धवन यांना जे सांगण्यात येणार, तेच ते न्यायालयात बोलणार आहेत.

२. रिझवी पुुढे म्हणाले की, रामजन्मभूमीवर बनवण्यात आलेली इमारत शास्त्रानुसार बांधण्यात आलेली मशीद नव्हती, तो मोगलांचा गुन्हा होता.


Multi Language |Offline reading | PDF