मुख्याधिकार्‍यांच्या योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीच्या आश्‍वासनानंतर हिंदुत्वनिष्ठांचे आमरण उपोषण स्थगित 

मुस्लिम सुन्नत जमीयतने शासकीय जागेवर केलेले अतिक्रमणाचे प्रकरण !

हिंदुत्वनिष्ठांच्या लढ्याला यश !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ५ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील गट क्रमांक ८४४/अ/१ या सरकारी भूमीवर मुस्लिम सुन्नत जमीयतने केलेल्या अवैध बांधकामाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाविषयी पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहोत, तसेच या संदर्भात न्यायालयात चालू असलेल्या दाव्यात नगर परिषदेच्या वतीने योग्य ती बाजू मांडत आहोत, तरी आपण दिलेले निवेदन मागे घेऊन नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यवाहीस सहकार्य करावे, असे लेखी आश्‍वासन हुपरीच्या मुख्याधिकार्‍यांनी हिंदुत्वनिष्ठांसमवेत झालेल्या चर्चेत दिले. त्यामुळे ५ सप्टेंबरपासून चालू होणारे उपोषण स्थगित करत असल्याचे धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे आणि श्री. संजय पाटील यांनी सांगितले.

या संदर्भात माहिती अशी की

१. मुस्लिम सुन्नत जमीयतने केलेल्या अवैध बांधकामाच्या विरोधात धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे आणि श्री. संजय पाटील यांच्यासह अन्य जणांच्या पाठिंब्यावर गेल्या २ वर्षांपासून लढा देत आहेत.

२. या संदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनास मनाई करता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने देऊनही प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीच हालचाल करत नव्हते.

३. त्यामुळे अखेरीस धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे आणि श्री. संजय पाटील यांनी निर्णायक भूमिका घेत प्रशासन अतिक्रमण हटवत नसल्याने ५ सप्टेंबरपासून हुपरी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाची चेतावणी दिली होती. या आंदोलनास हिंदु जनजागृती समिती, हिंदु महासभा, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, विश्‍व हिंदु परिषद, श्रीराम सेना, युवासेना, शिवसेना, हुपरी शहर भगवा रक्षक संघटना, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना, तरुण मंडळे यांनी पाठिंबा दिला होता.

४. आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर ४ सप्टेंबरपासून आंदोलनकर्त्यांसमवेत प्रशासन चर्चा करत होते. आंदोलनकर्त्यांवर प्रशासनाने विविध मार्गांनी दबाव आणण्याचाही प्रयत्न केला; मात्र आंदोलनकर्ते कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाईच्या मागणीवर ठाम राहिले.

५ . मुस्लिम सुन्नत जमीयत केलेल्या अवैध बांधकामाच्या विरोधात प्रशासन कारवाई करेपर्यंत कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन चालूच राहील, असे  धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे आणि श्री. संजय पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF