विद्यार्थ्यांनो, भ्रमणभाषच्या विळख्यातून सुटण्यासाठी श्री गणेशाचा नामजप करा ।

श्री. जयेश राणे

सध्याच्या विद्यार्थ्यांना आहे भ्रमणभाषचे पुष्कळ वेड । त्यामुळेच त्यांना जडले आहेत मानसिक विकार ।
असेच चालू राहिले, तर । भविष्यात त्यांना निश्चितपणे होणार गंभीर शारीरिक व्याधी ॥ १ ॥

भ्रमणभाषवरच वाया जात आहे । त्यांचा अधिकांश वेळ ।
त्यामुळे नाही राहिला । त्यांचा अभ्यासाशी ताळमेळ ॥ २ ॥

भ्रमणभाषच्या या जटील व्यसनातून । विद्यार्थ्यांना बाहेर कसे काढायचे ? ।
याचे पालक अन् शिक्षक यांच्यासमोर आहे कोडे । या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अपयशाचे पाढे वाचावे तेवढे थोडे ॥ ३ ॥

नीतीमत्ता-नैतिकता यांचेही वाजले तीन-तेरा ।
असे विद्यार्थी देश कसा घडवणार ? ।
याचा केवळ विचारच केलेला बरा ॥ ४ ॥

भ्रमणभाषच्या अती वापराने । विद्यार्थी झाले आहेत पुष्कळ हट्टी ।
प्रसंगी रुसून-फुगून, आदळ-आपट करून ।
पालकांशी घेत आहेत कट्टी ॥ ५ ॥

विद्यार्थ्यांच्या अशा स्वभावाची । पालकांना वाटते चिंता ।
व्यसनाधीनतेपुढे विद्यार्थी । करत नाहीत कोणाचीच पर्वा ॥ ६ ॥

भ्रमणभाषने त्यांना केले आहे अबोल ।
पालक म्हणतात, अरे बाबा, ।
भ्रमणभाष थोडा बाजूला ठेवून ।
आमच्याशी कधीतरी काहीतरी नीट बोल ॥ ७ ॥

पालक काही बोलल्यास । त्याचा उलट अर्थ काढून ।विद्यार्थी करत आहेत आत्महत्या ।
त्यांचे वैचारिक शुद्धीकरण केल्यानेेच । रोखता येतील या आत्महत्या ॥ ८ ॥

यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिदिन केला पाहिजे । श्री गणेशाचा नामजप ।
बालपणापासूनच त्यांच्याकडून करवून घ्यावा । श्री गणेशाचा नामजप ॥ ९ ॥

गणपतीचे ११ दिवस अधिकांशपणे ।
श्री गणेशाय नम: । हा जप करूया ।
अन् श्री गणेशाची अखंड कृपा संपादन करूया ॥ १० ॥

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई. (२३.८.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF