पाळण्यात आहे मनोहर कृष्ण मुरारि ।

कृष्णाच्या पाळण्याला बांधू ।
तळमळ अन् सातत्याची दोरी ॥
पाळण्यात आहे मनोहर कृष्ण मुरारि ॥ १ ॥

पाळण्यास लाविली ।
झेंडूची केशरी-पिवळी दैवी फुले सारी ।
पाळण्यात दिसे श्रीकृष्णाची हसरी मूर्ती ॥ २ ॥

बाळकृष्णाकडेच सर्व जण लडिवाळ हट्ट करती ।
आम्हाला तव चरण स्पर्शू दे एकदा तरी ।
कारण तोच सर्वांचा आत्मोद्धार करी ॥ ३ ॥

– सौ. वर्षा वैद्य, कुमठा नाका, सोलापूर. (२६.८.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF