कृपा करा सद्गुरु नाथा, हीच आर्त प्रार्थना ।

सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादा) वैद्यकीय उपचारांसाठी सोलापूरच्या सेवाकेंद्रात वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी आश्रमातील सर्व साधकांची व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी पुष्कळ तळमळीने प्रयत्न केले. त्यांनी अल्प कालावधीत आमच्या मनावर व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे मनात त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जागृत झाला आणि पुढील काव्य सुचले.

श्रीमती वर्षा कुलकर्णी

निमित्त होते वैद्यकीय उपचारांचे ।
खरे कारण होते साधक उद्धारण्याचे ॥ १ ॥

कशी सांगू आपली महती ।
त्यासाठी शब्दही अपुरे पडती ॥ २ ॥

साधकांची साधना व्हावी, हाच तुमचा ध्यास ।
त्यामुळे आम्हा लागली गुरुचरणांची आस ॥ ३ ॥

ही आस अखंड राहो माझ्या हृदयात ।
सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने मी आहे कृतज्ञताभावात ॥ ४ ॥

मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करण्यासाठी,
शक्ती देईल हरि आम्हाला ।
मग होईल उद्धार आमचा अन् आनंद होईल गुरुमाऊलीला ॥ ५ ॥

कशी व्यक्त करू कृतज्ञता समजेना या अज्ञानी जिवाला ।
कृपा करा सद्गुरु नाथा, हीच आर्त प्रार्थना आपणाला ॥ ६ ॥

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर (३०.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF