सद्गुरु दादा असती माऊली आम्हा सर्वांची ।

परात्पर गुरु डॉक्टर, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. मला तुमच्या सहवासाची, तुमच्या भेटीची ओढ पुष्कळ असते. जेव्हा मला तुमची आठवण अतिशय तीव्रतेने येते, तेव्हा तुम्ही सगुण रूपाने सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादा) यांच्या माध्यमातून मला भेटायला येता. त्या वेळी माझ्या मनात उमटणारे भाव पुढील कवितेद्वारे व्यक्त करत आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु दादा असती गुरुमाऊलीचे रूप ।
सद्गुरु दादा असती गुणांचे भांडार ॥

सद्गुरु दादा असती धारा चैतन्याची ।
सद्गुरु दादा असती माऊली आम्हा सर्वांची ॥ १ ॥

सद्गुरु दादा असती मांगल्याचे प्रतीक ।
सद्गुरु येता आम्हास मिळे चैतन्य अन् शक्ती ॥

स्वभावदोष-अहं निर्मूलनास साहाय्य करून ।
ते आम्हाला साधनेत सत्वर पुढे नेती ॥ २ ॥

सद्गुरु दादा पहाती अतिशय कृपाळू अन् प्रेमळ दृष्टीने ।
तेव्हा मज वाटे, माझी गुरुमाऊलीच पहाते माझ्याकडे ॥

सद्गुरु दादांचा लाभ होई देवद आश्रमातील साधकांना ।
यासाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त होई श्री गुरुचरणा ॥ ३ ॥

– गुरुमाऊलीच्या चरणांची धूळ, एक साधिका


Multi Language |Offline reading | PDF