(म्हणे) ‘अभिनेते शाहरूख खान यांनी भारतव्याप्त काश्मीरमधील अत्याचारांवर बोलायला हवे !’ – पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर

  • राष्ट्रप्रेमींनो, सावधान ! पाककडून आता भारतातील मुसलमानांना चिथवण्याचा प्रयत्न !
  • चोराच्या उलट्या बोंबा ! भारतव्याप्त काश्मीर नावाचा कोणताही प्रदेश नाही, तर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकनेच त्याचा काही भाग गिळंकृत केला आहे. तेथील लोकांवर होणारे अत्याचार तेच जगासमोर आणत आहेत. शाहरूख खान यांना काही बोलायचे असेल, तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर होणार्‍या अत्याचारांवर बोलायला हवे !
  • पाकच्या चिथावणीला भारतातील मुसलमान बळी पडले आणि ते उद्या भडकले अन् देशात यादवी माजली, तर त्याला सामोरे जाण्याची सिद्धता राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली आहे का ?

नवी देहली –  भारतव्याप्त काश्मीरमध्ये जो अत्याचार चालू आहे, त्याविरुद्ध शाहरूख खान यांनी आवाज उठवायला हवा. शाहरूख, सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘रॉ’चे हस्तक कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि २७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी भारताने केलेला एअरस्ट्राईक या सार्‍यावर दृष्टीक्षेप टाका. तुम्हाला भारतव्याप्त काश्मीरमधील अत्याचारांविरुद्ध बोलायलाच हवे. तसेच नाझीवादाने प्रेरित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाच्या सूत्राविरोधातही बोलायला हवे. (संघावर टीका करून पाककडून गेली ३ दशके आतंकवाद्यांची जी निर्मिती केली जात आहे, ती लपली जाणार नाही. पाकचा आतंकवाद हाच मुळात नाझीवाद आहे. पाकमध्ये गेल्या ७२ वर्षांत हिंदूंचा आणि अन्य अल्पसंख्याकांचा वंशसंहार झाला आहे आणि आजही होत आहे ! – संपादक) तरच तुम्ही शांतता आणि मानवता यांना प्रोत्साहन देऊ शकता, असा फुकाचा सल्ला पाकच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी अभिनेते शाहरूख खान यांना ट्वीट करून दिला आहे. (पाक सैन्याधिकार्‍याच्या तोंडात शांतता आणि मानवता असे शब्द शोभत नाहीत ! – संपादक)

 

अभिनेते शाहरूख खान यांच्या ‘रेडचिलीज्’ आस्थापनाची निर्मिती असणारी  नवी ‘वेब सीरिज’ (संकेतस्थळावर चालणारी मालिका) लवकरच चालू होणार आहे. याचा ‘ट्रेलर’ (झलक) नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा ‘ट्रेलर’ पाहून गफूर यांनी हा सल्ला दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF