(म्हणे) ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो काश्मिरींचा आवाज दाबला जात आहे ! – प्रियांका वाड्रा

  • राष्ट्रवादाच्या नावावर काँग्रेसने त्याच्या सत्ताकाळात जनतेवर, विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले, त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना आतंकवादी ठरवले, काश्मीरमधील हिंदूंचे पलायन आणि वंशविच्छेद होत असतांना काँग्रेस निष्क्रीय राहिली, याविषयी प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ?
  • जनसंघाचे तत्कालीन नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरच्या कारागृहात संशयास्पदरित्या मृत्यू झाला, तो त्यांचा आवाज कायमचा दाबण्याचाच प्रकार होता, हे प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ?

नवी देहली – काश्मीरमध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो लोकांचा आवाज दाबला जात आहे. काश्मीरमधील सर्व लोकशाही हक्कांवर गदा आणली जात आहे, यापेक्षा अधिक राजकीय आणि राष्ट्रविरोधी काहीच असू शकत नाही. या विरोधात आवाज उठवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्ही हे करण्यापासून थांबणार नाही, असे त्यांनी एका ट्विटर युजरच्या ट्वीटला री-ट्वीट करतांना म्हटले आहे.

या युजरने त्याच्या ट्वीटसमवेत एक व्हिडिओ ‘शेअर’ केला आहे, ज्यात एक महिला विमानात राहुल गांधी यांना काश्मीरच्या कथित सद्यस्थितीविषयी सांगतांना रडत असल्याचे दिसत आहे.


Multi Language |Offline reading | PDF