राममंदिर उभारण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल ! – महंत नृत्य गोपाल दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – राममंदिर उभारणे हा श्रद्धेचा विषय आहे आणि तो कोणीही कोट्यवधी भारतियांकडून हिरावून घेऊ शकत नाही. अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासाठी सध्याची सर्व परिस्थिती अनुकूल आहे, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी केले आहे. ‘केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, तर आता त्यांना मंदिर उभारण्यासाठी कोण रोखत आहे ?’ असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.

(म्हणे) ‘विरोधात गेलेला निर्णय मुसलमान मान्य करतील; मात्र हिंदू करणार नाहीत !’ – मुफ्ती मुदस्सर अली खान कादरी

  • आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर हिंदूंनी कायद्याचे पालन केले आणि धर्मांधांनी कायदा धाब्यावर बसवला, असेच दिसून येते ! त्यामुळे कादरी यांनी केलेले विधान हे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ होय !
  • मुसलमान त्यांच्या विरोधात गेलेला निर्णय मान्य करतील, असे समजता येणार नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगली याचे उदाहरण आहे !

महंत नृत्य गोपाल दास यांच्या या विधानावर येथील मुफ्ती मुदस्सर अली खान कादरी यांनी टीका करतांना म्हटले की, या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होणार आहे. तोपर्यंत सर्व पक्षकारांनी वाद निर्माण होण्यापासून दूर राहिले पाहिजे. जर न्यायालयाचा निर्णय मुसलमानांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारतील; मात्र हिंदूंच्या संदर्भात असे म्हणता येणार नाही. ते न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाहीत. विशेषतः जे अनावश्यक वाद निर्माण करत आहेत आणि न्यायालयावर दबाव निर्माण करत आहेत, ते हा निर्णय स्वीकारणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे आणि ५ न्यायाधिशांचे खंडपीठ त्यावर प्रतिदिन सुनावणी करत आहे. असे असतांना न्यायाधिशांवर हिंदूंच्या बाजूने निर्णय देण्यासाठी अशी विधाने करून दबाव का निर्माण करण्यात येत आहे ? (यात दबाव निर्माण करण्याचा प्रश्‍नच येत नाही ! जी वस्तूस्थिती आहे, तीच त्यांनी मांडली आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF