बरेली (उत्तरप्रदेश) येथे कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी धर्मांधांकडून शोभायात्रेवर दगडफेक

धर्मांधांकडून हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर होणारी आक्रमणे सहिष्णुतावादी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि प्रसारमाध्यमे यांना दिसत नाहीत का ?

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल बहेडी गावातील मकरी नवादा येथे कृष्णजन्माष्टमीच्या वेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी वाद निर्माण करून दगडफेक केली.

शुक्रवारी म्हणजेच २३ ऑगस्टला ही शोभायात्रा नमाजानंतर काढण्यात येणार होती. यात सहभागी झालेला ट्रॅक्टरला धर्मांधांनी तेथेच रोखले आणि परत मागे जाण्यास सांगितले. या वेळी वाद झाला आणि नंतर धर्मांधांनी शोभायात्रेवर दगडफेक केली. तसेच धारदार शस्त्रे आणि बंदुका यांचा धाक दाखवण्यात आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीमध्ये १० जण घायाळ झाले. येथील तणावाची परिस्थिती पहाता तेथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF