अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नवी देहली – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी शासकीय इतमामात येथील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जेटली यांचे पार्थिव देहलीतील भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF