यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासमवेत भगवा ध्वजही लावणार ! – अजित पवार यांची घोषणा

  • अस्तित्वात नसलेल्या ‘हिंदु आतंकवादा’च्या नावाने राळ उठवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारासाठी भगव्याचा आधार घ्यावा लागणे, हा त्यांना काळाने शिकवलेला धडाच म्हणावा लागेल !
  • ‘भगवा झेंडा लावायचा; पण हिंदुत्व मात्र स्वीकारायचे नाही’, हा पाताळयंत्रीपणा करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदु चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे अशा थोतांडाला भुलून ते राष्ट्रवादी काँग्रेसला मतांची भीक घालणार नाहीत !
  • शेवटची घरघर लागलेला सर्व ते प्रयत्न करून पहातो, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चालू आहे !

मुंबई – इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन झेंडे असतील. पक्षाच्या झेंड्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज लावण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेतील एका सार्वजनिक सभेत घोषित केले. या वेळी पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची एकट्याची जाहगीरदारी नव्हती किंवा मालकीही नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘भगवा पेलायला हातात बळ लागते’, असा टोला मारला आहे, तर खासदार संजय राऊत यांनी ‘अजित पवार यांची पावले कुठे पडत आहेत ?’, असे सूचक विधान केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF