भारताने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

चंडीगड (पंजाब) – वर्ष १९४७ मध्ये नेहरू यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न नेऊन ठेवला. आता पंतप्रधान मोदी यांनी तो तेथून मागे घेतला पाहिजे. त्यामुळे नियंत्रणरेषेचा प्रश्‍न नष्ट होईल आणि मग भारताचे सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तो प्रदेश परत भारतात घेईल, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे एका कार्यक्रमाच्या वेळी केले. या वेळी येथील भाजपच्या खासदार किरण खेर याही उपस्थित होत्या. ‘जर पाक सुधारला नाही, तर येत्या काळात पाकचे ४ तुकडे होतील’, असेही डॉ. स्वामी यांनी या वेळी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF