साधकांनो, आशीर्वाद घेऊ गुरुचरणांचा ।

साधकांना मोक्षप्राप्तीची वाट दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. सुधाकर जोशी

पुष्प होऊनी गुरुचरणांवरील
आनंद मिळू दे ।

दुःख द्यायचे, तर दुःख दे ।
नेेतांना मात्र आनंदाने ने ।

सदैव सेवा घडावी, हेच मागणे आता ।
साधकांनो, आशीर्वाद घेऊ गुरुचरणांचा ॥ १ ॥

देवा, तुझ्या चरणांवरची धूळ होऊनी ।
दास्यपद मिळावे हीच उराशी आशा ।
सदैव दर्शन तुझे घडावे, हेच मागणे आता ।

साधकांनो, आशीर्वाद घेऊ गुरुचरणांचा ॥ २ ॥

आम्ही म्हणतो माझे, माझे ।
मात्र कुणीच नसते कुणाचे ।
गुरुचरणांची धूळ करूनी मार्ग दाखवा देवा ।
साधकांनो, आशीर्वाद घेऊ गुरुचरणांचा ॥ ३ ॥

– श्री. सुधाकर के. जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF