(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती हौदात किंवा अमोनियम बायकार्बोनेटच्या मिश्रणात विसर्जित करा !’

  • ‘पर्यावरणपूरक’तेच्या नावाखाली पुणे महापालिकेचे धर्मशास्त्रविसंगत आवाहन

  • शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा जावईशोध

‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे शास्त्र सांगते. ‘पर्यावरणपूरकते’च्या नावाखाली नदीत विसर्जन करण्याच्या प्रथेला फाटा देऊन अन्य पर्याय सुचवण्यापूर्वी महापालिकेने कोणा धर्माचार्यांचे मार्गदर्शन घेतले होते का ? जर घेतले नसेल, तर हिंदूंच्या धार्मिक प्रथांमध्ये ढवळाढवळ करण्याचा महापालिकेला अधिकार आहे का ? रसायनाच्या द्रावणात श्री गणेशमूर्ती विरघळवून भाविक श्री गणेशमूर्तीचे विघटन करू इच्छित नाहीत. भाविकांना श्री गणेशमूर्तीची विल्हेवाट लावायची नाही, तर विसर्जन करायचे आहे. यंदाच्या वर्षी पाऊस पुरेशा प्रमाणात झाला असल्याने महापालिका आणि पाटबंधारे खाते यांना खरेतर विसर्जनासाठी नदीत पाणी सोडण्यास काही आडकाठी नसावी ! मात्र कोणत्याही खर्चाविना पार पडणार्‍या पारंपारिक गणेशोत्सवापेक्षा कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट यांवर लक्षावधींची उधळपट्टी करण्यामध्ये पालिका प्रशासनाला रस आहे. याचा ‘अर्थ’ काय घ्यायचा ?

पुणे – ‘पर्यावरणपूरकते’च्या नावाखाली येथील महापालिकेने यंदाही श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या धर्मशास्त्रविसंगत पर्यायांचा हेका कायम ठेवला आहे. ‘नागरिकांनी शक्यतो नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जित न करता महापालिकेच्या हौदात किंवा अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरीच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटची भुकटी (पावडर) विनामूल्य देण्यात येईल’, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी याविषयीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेली सूत्रे पुढीलप्रमाणे,

१. श्री गणेशमूर्ती शाडूची असो वा प्लास्टर ऑफ पॅरिसची, तिचे नदीत विसर्जन केल्याने नदीचे प्रदूषण होतच असते. (हा जावईशोध घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आयुक्तांना कधी लागला ? – संपादक) त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात यावा.

२. श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना शेजारीच प्रतिकात्मक रूपात सुपारीच्या गणपतीची स्थापना केली जाते. शास्त्र असे सांगते की, ही प्रतिष्ठापना विघ्नहर्ता म्हणून होते. श्री गणेशमूर्ती शाडूची किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची न आणता धातूची उत्सवमूर्ती आणून त्याजवळ सुपारीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना करून विसर्जनाच्या वेळी या सुपारीच्या श्री गणेशाचे विसर्जन घरच्या घरी बालदीत केल्यास नदीचे प्रदूषण टाळता येऊ शकेल. (मुळात श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते, हाच फसवा प्रचार आहे. नदीमध्ये वर्षभर मिसळणार्‍या सांडपाण्याकडे कानाडोळा करणार्‍या पालिका प्रशासनाला गणेशोत्सवाच्या वेळी होत नसलेल्या जलप्रदूषणाची दाहकता दिसते. पालिका प्रशासनाच्या या दुटप्पीपणातूनच हिंदुद्वेष दिसून येतो. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF