अधिकोषातील खात्यातून पैसे वटवणारी टोळी अटकेत

ठाणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) – उपाहारगृहातील वेटर आणि पेट्रोलपंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना हाताशी धरून ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे ‘क्लोनिंग’ करीत अधिकोषातील खात्यातून पैसे वटवणारे मोहंमद आरिफ खत्री, केशव मगता पात्रो  यांना पोलिसांनी अटक केली आहे. खत्री हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून त्याने संपूर्ण भारत आणि दुबई येथील १५ सहस्र कार्डांतून पैसे वटवत कार्डधारकांची फसवणूक केली आहे. आरोपींकडून कार्ड ‘क्लोनिंग’ करण्याची ३ यंत्रे, भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष जप्त करण्यात आले आहेत. या टोळीतील आसिफ शेख, मोहम्मद वरसुद्दीन अन्सारी आणि अन्य एक अशा पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (गुन्हेगारीत धर्मांधांचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण चिंताजनक ! – संपादक) या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF