जे ७० वर्षांत जमले नाही, ते आता काँग्रेसला शक्यच नाही ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – राहुल आणि सोनिया गांधी यांची चर्चेत रहाण्याची ही शेवटची धडपड चालू आहे. मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना धडा शिकवायलाच हवा. स्वत:च्या अस्तित्वासाठी पुन्हा काँग्रेसला सावरकर यांचेच सूत्र घ्यावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. सत्ता असतांना ७० वर्षांत जे जमले नाही, ते आता काँग्रेसला शक्यच नाही, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी केले. देहली विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने विटंबना केली होती. याविषयी रणजीत सावरकर यांनी मत व्यक्त केले.

या वेळी रणजीत सावरकर पुढे म्हणाले, ‘‘आमचे गांधी आणि तुमचे सावरकर म्हणणार्‍या राहुल गांधी यांना अभ्यासाची आवश्यकता आहे. या सर्व मूर्खांना गांधी क्षमा करोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विटंबना करणार्‍यांना क्षमा नाही. नुसत्या निषेधाच्या ४ शब्दांनी काही होणार नाही. आता याविरुद्ध पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची आवश्यकता आहे आणि तो आवाज देहलीपर्यंत पोचवायला हवा.’’


Multi Language |Offline reading | PDF