कोल्हापुरातील महापुराच्या लाटांशी झुंज देत नावेमधून पूरग्रस्तांना वाचवणारे धुळाप्पा आंबी !

जयसिंगपूर – शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती यंत्रणेने काम करण्यापूर्वी आलास येथील नौकाचालक श्री. धुळाप्पा आंबी यांनी ५ सहस्र नागरिकांना महापुराच्या विळख्यातून बाहेर काढले. ८ ते १६ ऑगस्ट २०१९ या कालावधीत श्री. आंबी यांनी जलप्रलयात प्रतिदिन अनुमाने ३ किलोमीटर नाव चालवून सहस्रो लोकांसाठी देवदूताचे काम केले. सामान्यपणे नाव चालवणे आणि महापुरात नाव चालवणे यात मोठा भेद असतो; मात्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा १२ घंट्यांमध्ये मिळेल ते खाऊन श्री. आंबी यांनी साहाय्यकार्य केले. वर्ष २००५ मध्ये आलेल्या महापुरातही श्री. धुळाप्पा यांचे वडील श्री. नरसिंगा यांनी अशीच सेवा देऊन सहस्रो लोकांचे जीव वाचवले होते. (साभार – दैनिक लोकमत)


Multi Language |Offline reading | PDF