सण आणि उत्सव साजरे करतांना उच्च न्यायालयाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

न्यायालयाच्या सूचनांचे पालन हे प्रतिदिन आणि केवळ हिंदूंच्या नव्हे, तर सर्वच सणांच्या संदर्भात व्हावे, ही हिंदूंची अपेक्षा आहे !

सांगली – जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, ध्वनीप्रदूषण नियम २००० मधील नियम ७ नुसार नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात ध्वनीप्रदूषण नियमाच्या उल्लंघनाच्या तक्रारीच्या संदर्भात तक्रार निवारण यंत्रणा चालू करावी. (उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणतीच ध्वनीयंत्रणा वापरण्यास अनुमती नसतांना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरून सकाळी ६ च्या आत सर्रास ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी केवळ हिंदूंच्या सणांसाठी नियम न लागू करता सर्वच धर्मियांविषयी हा नियम लागू करावा ! – संपादक)

अनुज्ञप्तीविषयक संस्थांनी ध्वनीप्रदूषण उल्लंघनाविषयी प्रत्येक तक्रारीची नोंद घ्यावी. तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचे संकेतस्थळ यांवर प्रदर्शित करावी. उत्सव साजरे करणार्‍या महत्त्वाच्या संघटनांची बैठक घेऊन ध्वनीप्रदूषण कायदेविषयक आणि पदपथावर तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्याविषयी, तसेच ध्वनीप्रदूषणाविषयीच्या नियमांची माहिती द्यावी. ध्वनीप्रदूषण नियमांचे सक्त पालन होईल, याविषयी महानगरपालिका आणि नगरपालिका यांनी आवश्यक कार्यवाही करावी. (अन्य धर्मियांचे सण जेव्हा साजरे केले जातात, तेव्हा मंडप अनुमती घेतली जाते का ? ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळले जातात, हेही प्रशासनाने पहाणे अत्यावश्यक आहे ! अन्यथा हिंदूबहुल देशात नेहमी हिंदूंच्याच सणांवर बंधने का ? असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ? –  संपादक)


Multi Language |Offline reading | PDF