डोंबिवली येथे आज सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे व्याख्यान !

श्री गुरुतत्त्व प्रतिष्ठान, श्री गुरुदेव दत्त संप्रदाय सेवा समूह यांच्या वतीने आयोजन

डोंबिवली – येथे श्री गुरुतत्त्व प्रतिष्ठान, श्री गुरुदेव दत्त संप्रदाय सेवा समूह यांच्या वतीने २५ ऑगस्ट या दिवशी गुरुतत्त्व मासिकाचे संपादक श्री. संतोष जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. आपल्या घरात सात्त्विकता, सकारात्मक ऊर्जा सतत वाढत रहावी या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ५ ते ७ या वेळेतील या व्याख्यानाचा सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यामध्ये नामजप आणि सेवा यांचे महत्त्व सांगण्यात येईल.

आठवड्यातील कोणत्याही दिवशी ‘नाम सत्संग कार्यक्रम’ प्रत्येकाच्या घरी घेण्यात येणार आहे. ज्यांना ‘आपल्या घरी हा कार्यक्रम व्हावा’, असे वाटत असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क क्रमांक : श्री. संतोष जोशी (सर) : ०९९२०९७९८८५

पत्ता : स्वामी घर, सरखोतवाडी, मानव कल्याणच्या जवळ, टाटा लाईन, कस्तुरी प्लाझा समोरचा रस्ता, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व)


Multi Language |Offline reading | PDF