श्रीरामपूर नगरपालिकेत १४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

श्रीरामपूर (जिल्हा नगर) – श्रीरामपूर शहरातील गटार योजनेच्या सांडपाणी प्रकल्पात अनुमाने १४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात २२ ऑगस्टला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ता केतन खोरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF