काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. संघटनेचा सोलापूरच्या सावरकरप्रेमींकडून निषेध

निषेध करतांना सावरकरप्रेमी

सोलापूर, २३ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देहली विद्यापिठात बसवण्यात आलेल्या पुतळ्यास काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी चपलेचा हार घालून काळे फासले. याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि सावरकरप्रेमी कार्यकर्ते यांनी येथील काँग्रेस भवनसमोर निषेध करून एन्.एस्.यु.आय.च्या पोस्टरवर काळी शाई फेकली.

या वेळी सर्वश्री सुधीर बहिरवाडे, समर्थ बंडे, यतिराज होनमाने, किरण जाधव, संकेत अटकळे, चिदम्बर कारकल आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘स्वातंत्रवीर सावरकर यांचा विजय असो’, ‘एन्.एस्.यु.आय. मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF