हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून देहली विश्‍वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगत सिंह यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतांना डावीकडून श्री. कार्तिक साळुंकेे, श्री. श्रीराम लुकतुके आणि श्री. अभय वर्तक

नवी देहली – येथील देहली विश्‍वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बसवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगत सिंह यांच्या पुतळ्याला २३ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजाजगृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उच्चशिक्षण संचालयाच्या कार्यालयात निवेदन दिले. या वेळी समितीचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंकेे, श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

२ दिवसांपूर्वी काँग्रेसप्रणीत ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले अन् चपलांचा हार घातला. त्याला कम्युनिस्टांची विद्यार्थी संघटना ‘ऑल इंडिया स्टूडंट्स असोसिएशन’नेही साहाय्य केले. या संघटनांनी सावरकर यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर समिती आणि सनातन यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF